Friday 29 May 2020

उत्कृष्ठ उद्योजक विचार

1)जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
- नारायण मूर्ती

2)यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
-- विश्‍वनाथन आनंद

3)नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्‍य आहे.** *
-- धीरूभाई अंबानी

4)पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो. *
-- जे. आर. डी. टाटा

5)फोटोग्राफरच्या एका "क्‍लिक'मुळे जगणे चिरकाल होते.** *
-- रघू राय

6)चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.*
- बिल गेट्‌स

7)मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता. *
- कल्पना चावला

8)कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.*
-- बराक ओबामा

9)माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
-- आयझॅक न्यूटन

10)मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा "माणूस' होणे; हे त्याचे यश आहे.
-- सर्वपल्ली राधाकृष्णन*

Tuesday 24 March 2020

मी वाचलेल्या पुस्तकांची नावे अणि विचार

१. मन में है विश्वास. - विश्वास नांगरे पाटील.

तुझी ओळख म्हणजे तू कोणते वस्त्र परिधान करतोस तुझं वय काय आहे किती वजन आहे तू कसा दिसतोस यावर अवलंबून नसते तर तुझी ओळख तू किती पुस्तक वाचलीस तुझ्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडतात तुझ्या वृत्ती
काय आहे तुझं ज्ञानभांडार काय आहे आणि तुझं स्वप्न कोणती आहेत यावर ठरणार आहे हे ध्यानात ठेव स्वतःला ओळख आपल्या कमतरता यांचा    बाऊ करू नकोस
त्या भरून काढ. ठरवून स्वतःला बदल. स्वतःबद्दल यशस्वी जेत्याच बनव व ते चित्र वास्तवात उतरवण्यासाठी झट.

अरे विश्वास आपली फांदी कधीतरी सोडून बघ सतत सुखद मर्यादित चेक करणारा आनंद देणाऱ्या कवचाच्या मध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नकोस कदाचित बाहेर खुल समृद्ध रचनात्मक भावनांचं विश्व तुझी वाट बघत असेल विचार बदल तुझा आयुष्य बदलेल

मनामध्ये जरवाईट विचार आले किंवा कामवासणा निर्माण झाली तर गरम तव्यावर बसून आपण या विचारांच्या मोहापासून प्रयत्नपूर्वक दूर जायचं असा विचार केला

सहा नोकर ठेवायचे ते तुला शिकवतील प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची त्या नोकऱ्यांची नाव आहेत what why when where and how ?. वाचन ज्ञान देत लिखाण नेमकेपणा आणत आणि चर्चा आपल्याला तत्पर आणि हजर भाबी बनवतात पूर्व मुख्य आणि मुलाखतीच हेच सूत्र आहे.

विश्वात तुला स्वामी विवेकानंदाच्या माणसाच्या संगती बद्दलचा एक विचार सांगतो आकाशातून एखादा थेंब  थेट हातावर पडला तर तो पाय धुवायला तुम्हालाही वापरता येत नाही तो तापलेला पत्रावर पडला तर क्षणार्धात नष्ट होतो तो कमलावर पडला होता  तर मोत्यासारखा चमकतो आणि जर शिंपल्यात पडला तर त्या पाण्याच्या थेंबात मूल्यवान मोती होतो तो थेंब सारखाच असतो पण त्याचं अस्तित्व कोणाच्या संपर्कात येतो यावर अवलंबून असतं.

जागा हो भावा वेळ गेलेली नाही दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून अभ्यास कर रात्र वैऱ्याची आहे असं समजून चौफेर चौकस राहा आणि सावधपणे लढ स्वतःचे डावपेच स्वतः टाक इतरांना त्याची भानकही लागू देऊ नकोस. संधीही सुर्योदयासारखी आहे खूप वेळ वाट पाहत राहिलास तर ती तिथून निघून जाईल आत्ताच लोहा गरम आहे घाव घाल भावा गाव घाल.

तर्कशुद्ध मांडणी भाषा कौशल्य विषयाचे ज्ञान व चांगला हस्ताक्षर आवश्यक होतं.


प्रत्येक गोष्टीची वेळ येत असते संयमाने त्याची वाट पाहिली पाहिजे खरं तर माझ्या मागे लागलो तर त्याला कधीही लिहिता येत नाही आणि जर संयम ठेवून मनापासून विरुद्ध दिशेला खडतर प्रवास करून आपण यशाचं शिखर गाठलं तर मोहम्मद हात जोडून आपल्यासमोर उभे राहतात.

आपल्या आत मध्ये ही दोन प्रवृत्तीच सदैव युद्ध सुरू असतं एक भव्य संताप असूया द्वेष दुःख स्वार्थ अपराधी भावना न्यूनगंड खोटेपणा गरव पश्र्चाताप उर्मटपणा या अव गुणांचा प्रतिनिधीत्व करते तर दुसरी शांती प्रेम दया आ शा, aaudary सहानुभूती परोपकार मैत्री आणि गुणांचा प्रतिनिधित्व करते ही लढाई ईश्वर आणि दैत्य पाप आणि पुण्य चांगुलपणा आणि वाईट पणा या दोघांमधील असते आणि कोण जिंकले ते ज्याला आम्ही प्रोत्साहन देतो ज्याला आम्ही खायला पहिला घालतो त्याच्या आम्ही आहारी जातो आणि होतो


Smart manje specific measurable achievable realistic and time-bound अर्थातच नेमका पक्का मोजका गाठता येईल तेवढा वस्तुनिष्ठ आणि विहित वेळेत संपेल अशा स्वरूपाचा व अशा पद्धतीने आता अभ्यास करायला शिका.


इंग्रजी हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि या फिरंगी भाषेवरही प्रभुत्व मिळविणार ही विश्व प्रतिज्ञा करा.

मुलाखतीच्या दरम्यान केलेली चूक त्वरित विसरला महत्त्वाचं असतं.


२. देह झाला चंदनाचा - राजेश खैर.

स्वाध्याय याचे संस्थापक परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित.



सकारात्मक विचासरणी🙏

सकारात्मक विचार हा अतिशय चांगला दृष्टिकोन यात शंका नाही. मात्र आपण नकारात्मक विचार करत असाल तर आपल्याला आयुष्यात होणाऱ्या घसरणीपासून कोणी थांबवू शकणार नाही. कारण अशा दृष्टिकोनामुळे आपण जेथे आहोत तेथेच राहतो.

डेव्हीड आणि गोलियथची गोष्ट सकारात्मक विचारांचे चांगले उदाहरण आहे. गोलियथ एक राक्षस होता. त्याने प्रत्येकाच्या हृदयात आपली दहशत निर्माण केली होती. एके दिवशी मेंढ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी 17 वर्षांचा डेव्हीड हा एक मुलगा आपल्या भावाला भेटण्यासाठी आला. तुम्ही या राक्षसाशी लढा का देत नाही, असे त्याने आपल्या भावाला विचारले. भावाने त्याला विचारले की, तू त्या राक्षसाचा आकार पाहिला आहेस का? तो इतका मोठा आहे की, एका फटक्यात आम्हाला मारुन टाकेल, असेही भाऊ म्हणाला.

यावर डेव्हीड म्हणाला, ‘तो मोठा आहे म्हणून त्याला मारता येणार नाही असे नाही. गोष्ट ही आहे की तो इतका मोठा आहे म्हणून त्याच्यावर सहजपणे निशाणा साधता येईल. त्याच्यावर लावण्यात आलेला निशाणा कधी चूकू शकणार नाही’. डेव्हीडने त्याच्याकडील बाणांनी राक्षसाला मारुन टाकले. राक्षस तोच होता. पण, डेव्हीडचा दृष्टिकोन त्याच्या भावापेक्षा वेगळा होता. डेव्हीडचा दृष्टिकोनही त्याच्या भावासारखाच असता तर तोही आयुष्यभर राक्षसाला घाबरत राहिला असता आणि त्याला त्याने केलेले अन्याय सहन करत रहावे लागले असते.
या गोष्टीतून हेच समजते कि, समस्या लहान असल्या किंवा मोठ्या तरी त्यामुळे घाबरुन जायचे नसते. प्रत्येक समस्या आपल्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त संधी देते असे लेखक नेपोलियन हील यांनी म्हटले आहे.

डॉ . अल्बर्ट एलिस . अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच  केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले . आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .

२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .

३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका .

४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता .

५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा.

६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका  . कारण आयुष्य अजून संपलेले नाही . दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .

७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .

८  ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .

९) दुसऱ्या व्यक्तीच्या  विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने  बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .

१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .



११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही  व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सनग्त. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते

माणसाने सोडून दायाच्या गोष्टी

माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.

  1. दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.
  2. दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.
  3. दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.
  4. दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणे.
  5. दुसर्‍याची कागाळी करणे.
  6. दुसर्‍यांच्या दुःखात आपले सुख मानणे.
  7. दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.
  8. दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणे.
  9. दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहणे.
  10. दुसऱ्याची फालतू चौकशी करणे.
  11. दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे.
  12. तुमचा खोटा अहंकार
स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे.एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका-टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.सगळ्या मित्र परिवारामध्ये मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकांना कमी लेखणे.आपण आपल्या लबाडी, स्वाथीॅ स्वभावाने लोकांना एक-दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकांना समजले की लोक आपल्यापासून दूर होऊ लागतात.

बिनधास्त जगायचे...

आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... *ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो*...
कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... आपण त्याच्या विषयी तसेच इतरां विषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे... बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा...
 फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...   
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात.

देवाशी संवाद ...........

माणूसदेवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का?

देवविचार ना.

माणूसदेवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा?

देवअरे काय झालं पण ?

माणूससकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देवबरं मग ?

माणूसमग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देवमग?

माणूस  : आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूसमला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देवबरं मग

 माणूस  : संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती.मी इतका थकलो होतो की .सी. लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

देवआता नीट ऐक .
आज तुझा मृत्यूयोग होता. मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला. त्या गडबडीत अलार्म पण थांबला .

तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .

कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती. ते  सँडविच वर निभावलं.

तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता.

संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूसदेवा मला क्षमा कर .

देवक्षमा मागू नकोस. फक्त विश्वास ठेव. माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 

आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो
मग *श्रवणाच्या* वेळी डुलक्या का येतात
तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही. ...
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो..... देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं
माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,
 पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो तूप नाही..अगदी तसच... आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  
 'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे .
जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे
 सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग आसले
तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही 
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा