# सुरुवातीपासून स्वत: ला प्रोत्साहीत ठेवण्याचे ८ मार्गः🏋🏻
योग्य प्रेरणेसह प्रारंभ करणे महत्वाचे आहे कारण चांगली सुरुवात आपल्यास दीर्घकाळ टिकवून ठेवते व आपला वेग वाढवते. जर आपण योग्य सुरुवात केली तर यशस्वी होण्याची आपल्याकडे अधिक चांगली संधी आहे. येथे प्रारंभी महत्वपुर्ण ठरतील असे काही मुद्दे: 🤓
१. लहान सुरुवात करा: 🏋🏻
ध्येय पूर्ण होईपर्यंत स्वतःला प्रवृत्त करण्यासाठी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मोठी सुरुवात करू नका! अगदी सोप्या ध्येय्यासह प्रारंभ करा आणि नंतर तेथुन ते मोठं करा!💪🏻
२. एका वेळी एकच गोष्ट: ☝🏻
बरेच लोक एकाच वेळी बऱ्याच गोष्टी हाथी घेतात आणि एकाच वेळी बरेच काही करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळं ते ऊर्जा आणि प्रेरणा लवकर गमवतात, कदाचित ही सर्वात सामान्य चूक आहे. आपल्याला एका वेळी एकच धेय्य निश्चित करणे आवश्यक आहे आणि पूर्णपणे लक्ष त्यावर केंद्रित करणे!✌🏻
३. आपली प्रेरणा काय आहे तपासून बघा: 👊🏻
आपली ध्येय्या-मागची कारणे जाणून घ्या. त्याच्याविषयी विचार करा आणि ते लिहून घ्या. जर आपण आपलं स्वप्न आपल्या प्रिय गोष्टीशी किंवा प्रिय व्यक्तीशी जोडू शकलो आणि तुम्ही त्यांच्यासाठी हे करत असाल, तर ते स्व-स्वारस्याने करण्यापेक्षा अधिक शक्तिशाली ठरेल. स्वतःसाठी स्वप्न पूर्ण करणे चांगले आहेच, परंतु आपल्या मनाच्या जवळ असणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक बदलाशी आपलं धेय्य जोडलेल असणं तितकंच महत्वाचं आहे!😍
४. एखादी गोष्ट खरंच, खरंच हवी असणेे: 😘
हे वरील युक्तीशी जुळतेच आहे, परंतु हवी ती गोष्ट प्राप्त केली तर किती छान होईल, एवढी भावना पुरेशी नाही. असे काहीतरी आसणे आवश्यक आहे ज्याबाबत आपण अतिशय आग्रही आहात, काहीतरी ज्याबद्दल उत्साही आहात! आपली ध्येय या निकषांशी जुळत असल्याचे सुनिश्चित करा त्यामुळे आपण जास्त काळ ध्येय्यावर टिकून राहू शकाल!
उत्तम संभाषण कसे कराल ?
☑ उत्सुकता
कोणत्याही विषयावर चर्चा सुरु असेल तर तुमची उत्सुकता दिसू द्या. तुमची उत्सुकता समोरच्याला संभाषण वाढवण्यास मदत करेल.
☑ सकारात्मकता
बऱ्याच वेळा चर्चेत नकारात्मक विषय असतात, पण ते आपल्याला लक्षात येत नाहीत. नकारात्मक विषयांचा आपल्याला त्रास जास्त होतो. त्यामुळे सकारात्मक विषयांवर चर्चा करा, नकारात्मक विषय टाळा.
☑ वाद घालू नका
बऱ्याच वेळा एखाद्या चर्चेत कोणाचे म्हणणे पटले नाही तर वाद घातले जातात. पण तसे करून तुम्हाला समोरच्याचे म्हणणे कळणारच नाही. समोरच्याला त्याचे म्हणणे मांडू द्या आणि तुम्ही तुमचे म्हणणे मांडा, वाद घालू नका.
☑ समोरच्याचा आदर करा
प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे जसे तुमचे म्हणणे समोरच्याने ऐकावे असे वाटते, तसेच समोरच्याच्या म्हणण्याचा आदर करा.
☑ डावलू नका
खूप वेळा असे होते की चर्चेत एखादा मुद्दा पटला नाही तर बरेच जण ते मान्य करत नाहीत आणि त्यांचंच म्हणणं खरं आहे असं दाखवतात. तुमचेच म्हणणे खरे आणि बाकी सगळे खोटे असे वाटू देऊ नका, याने तुमची माणसे तुटतील.
☑ प्रामाणिक राहा
एखादी गोष्ट जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याबद्दल कबुली द्या. काहीच माहिती नसताना खोटे सांगू नका. तुमच्या स्वतःशी खरे आणि प्रामाणिक राहा.
🆕 कायम नवीन शिकण्याची वृत्ती कशी आत्मसात कराल ?
💪 इच्छाशक्ती
नवीन काही शिकायचं असेल तर तुम्हाला आधी इच्छाशक्ती जवळ बाळगावी लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्यातला आळस बाजूला करावा लागेल.
👨🏻🏫 योग्य शिक्षक
सतत नवीन काही शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अशी कोणी व्यक्ती शोधावी लागेल जी कायम अपडेटेड असते. तुमचं जे क्षेत्र आहे त्यात त्यांना चांगलं ज्ञान आहे, असं जर दिसून आलं तर त्या व्यक्तीचं मार्गदर्शन नेहमी मोलाचे ठरेल.
🕣 योग्य वेळ
योग्य वेळ कोणती ? तर तुम्हाला जेव्हा नवीन काही शिकावं वाटेल, ती खरी योग्य वेळ असेल ! "अमुक वयातच शिकायला पाहिजे होतं" असं जर म्हणालात तर मग मात्र तुमच्या नवीन काही शिकण्याला बाधा येईल.
👥 योग्य मित्र
योग्य शिक्षक आणि योग्य वेळेसोबतच तुम्हाला योग्य मित्राची सुद्धा खूप गरज आहे. तुम्ही आणि तुमचा मित्र, दोघांचे एखाद्या गोष्टीसाठी दृष्टिकोन वेगळे असू शकतात आणि ते तुम्हाला नवीन गोष्टी शिकताना मदत करू शकतात. त्यामुळे असे काही मित्र शोध जे कायम नवीन काहीतरी शिकण्याच्या मागे असतात.
▶ सातत्य
नवीन काही शिकायचं म्हटलं की तुमची इच्छाशक्ती ही आलीच. ती असेल आणि जर सातत्य नसेल तर मग तुमच्या इच्छाशक्तीचा काहीच उपयोग राहणार नाही ! त्यामुळे तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे सातत्य या दोन्ही गोष्टी नवीन काही शिकण्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत.