सकारात्मक विचासरणी

1.

सकारात्मक विचार हा अतिशय चांगला दृष्टिकोन यात शंका नाही. मात्र आपण नकारात्मक विचार करत असाल तर आपल्याला आयुष्यात होणाऱ्या घसरणीपासून कोणी थांबवू शकणार नाही. कारण अशा दृष्टिकोनामुळे आपण जेथे आहोत तेथेच राहतो.

डेव्हीड आणि गोलियथची गोष्ट सकारात्मक विचारांचे चांगले उदाहरण आहे. गोलियथ एक राक्षस होता. त्याने प्रत्येकाच्या हृदयात आपली दहशत निर्माण केली होती. एके दिवशी मेंढ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी 17 वर्षांचा डेव्हीड हा एक मुलगा आपल्या भावाला भेटण्यासाठी आला. तुम्ही या राक्षसाशी लढा का देत नाही, असे त्याने आपल्या भावाला विचारले. भावाने त्याला विचारले की, तू त्या राक्षसाचा आकार पाहिला आहेस का? तो इतका मोठा आहे की, एका फटक्यात आम्हाला मारुन टाकेल, असेही भाऊ म्हणाला.

यावर डेव्हीड म्हणाला, ‘तो मोठा आहे म्हणून त्याला मारता येणार नाही असे नाही. गोष्ट ही आहे की तो इतका मोठा आहे म्हणून त्याच्यावर सहजपणे निशाणा साधता येईल. त्याच्यावर लावण्यात आलेला निशाणा कधी चूकू शकणार नाही’. डेव्हीडने त्याच्याकडील बाणांनी राक्षसाला मारुन टाकले. राक्षस तोच होता. पण, डेव्हीडचा दृष्टिकोन त्याच्या भावापेक्षा वेगळा होता. डेव्हीडचा दृष्टिकोनही त्याच्या भावासारखाच असता तर तोही आयुष्यभर राक्षसाला घाबरत राहिला असता आणि त्याला त्याने केलेले अन्याय सहन करत रहावे लागले असते.
या गोष्टीतून हेच समजते कि, समस्या लहान असल्या किंवा मोठ्या तरी त्यामुळे घाबरुन जायचे नसते. प्रत्येक समस्या आपल्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त संधी देते असे लेखक नेपोलियन हील यांनी म्हटले आहे.

डॉ . अल्बर्ट एलिस . अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच  केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले . आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .

२) माणसाला वाटणारी भीती ही  कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते . ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते , परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते . पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही . म्हणजेच भीती हि काल्पनिक असते .

३)निराशा येणे ही  मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता . जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही . तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता.यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये  स्वतःचे आयुष्य तोलू नका . तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते . तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते . त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसर्यांशी करू नका .

४) जग काय म्हणेल हा विचार खोटा  आहे . प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो . आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे . कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता .

५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे . स्वतःचे अस्तित्व , आपले कुटुंबातील स्थान , समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही . दुसर्यांवर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा.

६) स्वतःला स्वीकारा . तुम्ही जसे आहात तसे . आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा . संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका  . कारण आयुष्य अजून संपलेले नाही . दुसर्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता . कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा . जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल .

७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात . त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा . दुसर्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नाका .

८  ) शारीरिक व्याधींशी सामना करताना बर्याचदा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते . अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका . कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा  पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा . मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते .

९) दुसऱ्या व्यक्तीच्या  विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही . माणूस आपल्याला हवे तसे जगाने  बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो . परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही . तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता . वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे  फायद्याचे नसते . तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते . तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा .

१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र  बदलवू शकतो . फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे . हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ  आहे . कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात . एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते . परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .

११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो . मानसिक नाही . तुम्ही  व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सनग्त. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही . प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते