सतत आनंदी राहण्यासाठी स्वतःचे चांगले मित्र कसे बनाल ? 😉

स्वतःचा चांगला मित्र बनता आलं तर आपण आपल्या गरजा चांगल्या पद्धतीने समजू शकू, आणि त्या पूर्ण करण्यासाठी सुद्धा योग्य प्रयत्न करू शकू. आपला जोडीदार, मित्र किंवा इतरांवर अबलांबून राहण्यापेक्षा जर आपण आपली आंतरिक सपोर्ट सिस्टिम मजबूत करू शकलो तर जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण स्वतःची मदत करू शकतो!😎
    खाली पाहू समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी स्वतःचे मित्र कसे बनता येईल:🤔
. स्वतःशी चांगलं वर्तन ठेवा:😘
     स्वतःचा चांगला मित्र बनण्याचं पाहिलं पाऊल म्हणजे स्वतःशी चांगकी वागणूक ठेवण. म्हणजेच स्वतःची अलोचना करणं बंद करणे, स्वतः विषयी नकारात्मक भावना दूर सारणे, आपले चांगले गुण, क्षमता, आणि प्रतिभांचा स्वीकार करणे .
     एखाद्या समस्येत अडकला असाल तर कल्पना करा की जर तुमचा जवळची एखादी व्याक्ती याच परिस्थिती असती तर तुम्ही काय सल्ला दिला असता? आणि तोच सल्ला तुम्ही अमलात आणा!🏻
. स्वतःच्या गरजांना प्राथमिकता द्या:🙌🏻
      ज्या पद्धतीने आपण आपला परिवार, मित्रा आणि इतर संबंधांची काळजी घेतो त्याप्रमाणेच स्वतःला हवं-नको त्याची काळजी घ्या. पुस्तक वाचन, सेल्फ केअर, सोशल लाईफ इतर छंद जोपासा!👩🏻‍🌾
. आपल्यासाठी योग्य विचार करायला शिका:
       आपल्या डोक्यात दिवसभरात ६०,००० पेक्षा जास्त विचार येतात त्यामुळे येणार प्रत्येक विचार हिताचा असेलच असे नाही, त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही करू शकत नाही असा विचार करण्यापेक्षा तुम्ही उलट चांगल्या पद्धतीने ती कशी करू शकता या पद्धतीने विचार करायला शिका!😇 जसा विचार कराल, तसेच घडाल!🤓